7 जानेवारी 2023 रोजी, M4 World Championship Playoff Stage सुरू होईल
M4 World Champion Playoff साठी ब्रॅकेट, ज्याला सामान्यतः Knockout म्हणून संबोधले जाते, निश्चित केले गेले आहे. World Championship जिंकण्याच्या संधीसाठी कोणत्या दोन संघांचा सामना Grand Final मध्ये होईल हे निर्धारित करण्यासाठी संघ आता स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होतील. 7 जानेवारी 2023 रोजी, M4 World championship Playoff टप्पा सुरू होईल.
Upper आणि Lowerच्या Bracket मध्ये 16 संघांचे समान वितरण केले जाईल. उर्वरित संघ Lower Bracket तून त्यांच्या मार्गावर काम करत असताना, मागील टप्प्यातील प्रत्येक गटातील शीर्ष दोन संघ Upper Bracket मध्ये सहभागी होतील.
M4 World Championship Playoff साठीचा Format पुढीलप्रमाणे असेल-
– Double Elimination असेल.
– Double Elimination मध्ये एकुण सोळा संघ खेळतील.
– Upper Bracket मध्ये आठ संघ सुरू होतात, तर Lower Bracket मध्ये आठ संघ सुरू होतात.
– Grand final हा BO7 सामना आहे, Lower Bracket च्या पहिल्या दोन फेऱ्या BO3 मालिकेत आणि इतर फेऱ्या BO5 सामन्यात खेळल्या जातात.
M4 World Championship Playoff च्या काल झालेल्या सामन्यांचे संक्षिप्त रुप
M4 World Championship Playoff साठी काल दोन सामने झाले. ज्यामधील एक सामना हा Upper Bracket साठी खेळला गेला तर एक सामना हा Lower Bracket साठी खेळला गेला. सामन्यांचे खेळ पाहण्यासाठी Mobile Legends: Bang Bang Official YouTube चॅनेल पहा.
M4 World Championship Playoff Upper Bracket सामन्याचा संक्षेप-
Upper bracket साठी काल एक सामना झाला. हा सामना बेस्ट ऑफ ५ होता. हा सामना RRQ Hoshi vs. Blacklist Intl. यांच्यात झाला. हा सामना अतिशय रोमांचक झाला. कारण दोन्ही संघाना या सामन्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे होते.
RRQ Hoshi vs. Blacklist Intl.
पहिला गेम हा २० मिनिट ३७ सेकंद चालला. हा गेम अत्यंत रोमांचक झाला परंतु या गेम मध्ये RRQ Hoshi ने चांगला खेळ करत तो जिंकुन घेतला. दुसरा गेम मध्ये Blacklist Intl. ने वापसी केली व हा गेम त्यांनी जिंकुन घेतला. हा गेम बारा मिनिट छत्तीस सेकंद चालला. तीसरा गेममध्ये पुन्हा एगदा चांगला खेळ करत तो गेम Blacklist Intl. ने जिंकला. हा गेम बावीस मिनटे आठावन सेकंद चालला.
चौथा गेम हा दोन्ही संघासाठी निर्णायक होता. या गेम मध्ये RRQ Hoshi ने वापसी केली या गेम मध्ये विजय मिळवला. आता स्कोर समान झाले होते. दोघांसाठी शेवटचा म्हणजेच पाचवा गेम जिंकणे गरजेचे होते. हा गेम खुप वेळ चालला. एकुण २४ मिनिटे हा गेम चालला. या गेममध्ये Blacklist Intl. ने विजय मिळवला. व सामनासुदधा २-३ अशा फरकाने जिंकुन घेतला. व ते पुढील Round साठी qualify झाले.
M4 World Championship Playoff Lower Bracket सामन्याचा संक्षेप-
काल Lower Bracket साठी एक सामना झाला. हा सामना Falcon Esports vs. Incendio Supremacy यांच्यात झाला. हा सामनासुदधा बेस्ट ऑफ ५ होता.
Falcon Esports vs. Incendio Supremacy
या सामन्यामध्ये सर्वप्रथम पहिल्या गेम मध्ये Falcon Esports ने चांगला खेळ केला व पहिला गेम सहज रित्याजिंकुन घेतला. पहिला गेम हा १४ मिनिट ५८ सेकंद चालला. दुसरा गेम मध्ये Incendio Supremacy ने वापसी केली व दुसरा गेम जिंकला.
तीसरा गेम सुदधा चांगला खेळ करत Incendio Supremacy ने जिंकला. परंतु त्यांचा हा विजय जास्त काळ टिकु शकला नाही. चौथा गेम अतिशय चांगला खेळ करत Falcon Esports स्पर्धेत पुन्हा परत आला. व चौथा गेम जिंकला. त्यानंतरचा पाचवा गेम सुदधा Falcon Esports ने चांगला खेळ करत जिंकला व सामना सुदधा २-३ अशा फरकाने Falcon Esports ने जिंकुन घेतली.
Conclusion-
7 जानेवारी 2023 रोजी, M4 World championship Playoff टप्पा सुरू झाली व १५ तारखेला संपेल. आणखी काही Update साठी GosuGamers India वाचत रहा.