लिमा मेजर मधील ब्रॉडकास्ट संबंधी सर्व माहिती जाणुन घ्या
Lima Major २०२३ ही एक डोटा प्रो सर्किट सिरिज आहे. ही टुर्नामेंट ४डी एस्पोर्ट्स इप्लज ने आयोजीत केलेली आहे. लिमा मेजर २०२३ चे स्पाँन्सर मेमरी किंग्ज, क्लॅरो, व्हीएसजी, बॅकस हे आहेत. ही टुर्नामेंट एक ऑफलाईन टुर्नामेंट आहे. ज्याचे लोकेशन लिमा येथे आहे. या स्पर्धैचे स्वरुप ग्रुप स्टेजसाठी राऊंड रॉबीन आहे आणि प्लेऑफ साठी डबल एलिमिनीशेन आहे. या स्पर्धेमध्ये एकुण १८ संघ सहभागी होणार आहेत.
लिमा मेजर २०२३ ची सुरुवात २२-०२-२०२३ होईल आणि समाप्ती ५-०३-२०२३ रोजी हाईल. या टुर्नामेंट चे एकुण बक्षिस $५००,००० युएसडी इतके आहे. तसेच ही एक टीयर १ टुर्नामेंट आहे. या स्पर्धेचे एकुण १,९०० इतके प्रो सर्किट पाँईटस आहेत. याचे ठिकाण अरेना १ हे आहे.
The first Major of the season is upon us. Here are the wonderful people to tell the story live from Lima. @Esports4d pic.twitter.com/gyNOyh0dt5
— EPULZE (@EPULZEgaming) February 19, 2023
लिमा मेजर २०२३ च्या फॉरमॅट बददल जाणुन घ्या सर्व काही
सहभागी संघ-
- एकुण १८ संघानी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे.
- पश्चिम युरोप आणि चीनने प्रत्येकी चार संघ मैदानात खेळण्यासाठी उतरवतील.
- आग्नेय आशिया आणि पूर्व युरोपने प्रत्येकी तीन संघ मैदानामध्ये पाठवतील.
- उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील प्रत्येकी दोन संघ मैदानामध्ये येतील.
ग्रुप स्टेज-
ग्रुप स्टेज २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान खेळला जाईल.
- प्रत्येकी नऊ संघांचे दोन गट आहेत.
- सर्व मॅचअप्स सिंगल राऊंड रॉबीन आहेत.
- सर्व मॅचेस हे बेस्ट ऑफ २ असतील.
- प्रत्येक गटातील अव्वल चार संघ प्लेऑफच्या वरच्या कंसात प्रवेश करतील.
- प्रत्येक गटातील पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाचे संघ प्लेऑफच्या लोअर ब्रॅकेट मध्ये जातील.
- उर्वरित संघ अपात्र ठरले जातील.
प्लेऑफ चे सामन्याचा फॉरमॅट पुढीलप्रमाणे असेल
२८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२३ या कालावधीत होतील.
- डबल एलिमिनीशेन ब्रकेट असेल.
- ग्रँड फायनल वगळता सर्व सामने बेस्ट-ऑफ-थ्री आहेत.
- ग्रँड फायनल हा बेस्ट ऑफ ५ मधील सामना आहे.
लिमा मेजर २०२३ च्या ब्रॉडकास्ट टॅलेंट बददल जाणुन घ्या
१९ फेब्रुवारी २०२३ रोजी इंग्लिश ब्रॉडकास्ट टॅलेंट चे अनावरण करण्यात आले. लिमा मेजर २०२३ पुढील ब्रॉडकास्टर चे अनावरण करण्यात आले.
लिमा मेजर २०२३ इंग्लिश होस्ट साठी त्सुनामी म्हणजेच निल खांन्दीरीया जे युनाईटेड स्टेटस चे आहेत त्यानंतर शिवर म्हणजेच जोरीयन वॅन डर हेयजडेन आणि स्नॅरे म्हणजेच सिन Rihlamvu यांची निवड करण्यात आली. ऑब्जरव्हर साठी skrff म्हणजेच रीकार्ड होल्म मेलीन यांची निवड करण्यात आली. कंमेटेटरस साठी ८ जणांची निवड करण्यात आली यामध्ये जेनक्नींस(अँड्र्यू जेनकिन्स), जॉर्डन इफे (मीरा रियाद), शीपस्टिक्ड (अलेक्झांड्रा रॉबर्ट्स), फियर (क्लिंटन लूमिस), अस्टिनी (फिलिप अस्टिनी), पर्ज (केविन गोडेक), विंटर (चॅन लिट बिन), द अझाथोथ (कार्लोस रिओस) यांची निवड करण्यात आली.
फॉग्ड (इओनिस लुकास), क्रोएशिया चे लॅकोस्टे (डोमिनिक स्टिपिक), युनायटेड किंगडम चे गॅरेथ (गॅरेथ बेटसन), स्पेन चे Avo+ (अल्वारो सांचेझ वेलास्को), युनायटेड स्टेट्स चे सीकएनस्ट्राइक (रिची गार्सिया), युनायटेड स्टेट्स चे एसव्हीजी (अव्हेरी सिल्वरमॅन), युनायटेड स्टेट्स चे कॅप (ऑस्टिन वॉल्श), कॅनडा चे ट्रेंट (ट्रेंट मॅकेन्झी), युनायटेड स्टेट्स चे लिरिकल (गॅब्रिएल क्रूझ) यांची सुदधा भाष्यकार म्हणून घोषणा करण्यात आली.
निष्कर्ष-
१९ फेब्रुवारी २०२३ रोजी इंग्लिश ब्रॉडकास्ट टॅलेंट चे अनावरण करण्यात आले. लिमा मेजर २०२३ पुढील ब्रॉडकास्टर चे अनावरण करण्यात आले. तसेच लिमा मेजर २०२३ ची २२-०२-२०२३ पासून सुरुवात होणार आहे. लिमा मेजर २०२३ बददल आणखी काही माहिती जाणुन घ्या आमच्या मागील लेकात.